Posts

Showing posts from December, 2019
Image
पितृसत्तेविरोधातला आंतरराष्ट्रीय आवाज चिलियन सामान्य माणसापासून तिथल्या न्यायव्यस्थेच्या मनामनात ठासून भरलेल्या लैंगिक भेदभावामुळे अनेकदा लैंगिक हिंसाचारातल्या पिडितांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच तिथली न्यायव्यवस्था, तिथलं प्रशासन, वकील, डॉक्टर्स हे सगळेच पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत असं म्हणत चिलीमधल्या बायकांनी गाणं सादर केलं. तुम्हीच आहात बलात्कारी असं म्हणत डोळ्यांवर पट्टा बांधून डान्स करत हे गाणं गायलं. ‘लासटेसिस’ या थेअटर कंपनीनं हे गाणं लिहिलंय. लायटेसीस हा इथला स्त्रीवादी ग्रुप म्हणून ओळखला जातो. अर्जेंटिना देशातली अभ्यासक रीटा सेगाटो हिच्या कामावरुन प्रभावित होऊन हे गाणं लिहिलं असल्याचं सांगितलं जातं. लैंगिक हिंसाचार हा नैतिकतेचा मुद्दा नाही. ती एक राजकीय समस्या आहे, असं रीटाचं म्हणणं आहे. चिलीमधे सादरीकरण झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू सगळ्या देशात हे गाणं पसरलं. त्यानंतर चिलीप्रमाणेच मॅक्सिको, जर्मनी, फ्रान्स, युके, स्पेन अशा अनेक देशातल्या महिलांनी रस्त्यावर येऊन नाचत हे गाणं सादर केलं. काही देशांनी तर हे गाणं सादर करण्यावर ब...